निर्देशिका
मंदिर व इतिहास
ध्येय
आमच्या विषयी
संपर्क
देणगी
बातम्या
सह्याद्री पर्वताच्या एका मोठ्या ओंजळीतून वाहात आलेल्या अमृतवाहिनेने पावन असलेल्या प्रवरेच्या काठी वसलेलं अकोले गाव आहे. येथे श्री लक्ष्मी नारायण, श्री गणपती, व श्री एकमुखी दत्तांची तसेच गावातल्या लोकांनी बसवलेली श्री दत्तांची त्रिमूर्ती, अशा देवता असलेले श्री दत्त मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे आपले मंदिर.

सध्या मंदिरात दरवर्षी दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण होते. दत्त जन्माचा पाळणा होतो. महापूजा असते. पालखी निघते. तसेच महाप्रसाद असतो. मोठा सोहळा असतो. गावभर माधुकरी मागून व वर्गणी जमा करून कार्य सिद्धीस नेले जाते. वरील ह्या सर्व गोष्टींची सुसुत्रबद्ध पद्धतीने मांडणी करून हिशेब ठेवण्यासाठी ट्रस्ट (न्यास) स्थापन करावा असे ह्या सर्व जणांना वाटले. ट्रस्ट स्थापन झाल्यावर ह्या पुरातन कालिन मंदिराचा जीर्णोद्धार शक्य होईल. त्यांच्या प्रार्थनेला अनुसरून श्री दत्त मंदिराचा ट्रस्ट (न्यास) पुनर्बांधणीचे कार्य नुकतेच पार पडले. धर्मादाय आयुक्तांची परवानगी मिळाली. त्यानुसार न्यासाने ध्येय रचून काम करायला सुरवात केली आहे. त्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे.

श्री गणपती, लक्ष्मी-नारायण व दत्त मंदिराचा जिर्णोद्धार:
  • नवीन मंदिर कसे व्हावे ह्याचा आराखडा रेखाटण्याचें काम सुरु आहे.
  • ट्रस्टने सरकारी नियमानुसार आपले कार्य आरंभ केले आहे.
  • त्यानुसार आपणा सर्वांकडून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी मागत आहोत.
  • तरी आपण सर्वानी ट्रस्टच्या मोबाईल नंबर वर अथवा QR Code वर अथवा बँकेच्या खात्यामध्ये यथाशक्ती देणगी जमा करावी.
देणगी साठी बँकेची माहिती खालील प्रमाणे आहे:
Beneficiary Account Name
Katyayani Bramhan Samaj Datta Mandir Nyas Akole Dist Ahmednagar
Account Number: 42120100005376
IFSC: BARB0AKOLEX
vpa : katyayani52424@barodampay
 कात्यायनी ब्राह्मण समाज दत्त मंदिर न्यास अकोले