श्री लक्ष्मी नारायण, श्री गणपती, व गावातल्या लोकांनी बसवलेली श्री दत्तांची त्रिमूर्ती अशा देवता असलेले हे अकोले येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर
इतिहास:
येथे असलेली श्री लक्ष्मी नारायण यांची वालुकामय मूर्ती तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वीची असल्याचे कळते. श्री गणपती यांची मूर्ती सुद्धा ऐतिहासिकच आहे, असं लोक मानतात.
श्री एकमुखी दत्तांची मूर्ती सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीची असावी.
गुरुचरित्राच्या चाळीसाव्या अध्यायात, श्री दत्त महाराजांचा दिव्य अवतार "श्री नृसिंह सरस्वती" महाराज यांच्यामुळे ज्या श्री नरहर कवि यांचे कुष्ठ बरे झाले, त्यांचे पणतू श्री विठ्ठल कवि ह्यांनी, सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी, येथे श्री लक्ष्मी नारायण व श्री गणपती असलेल्या मंदिरात, श्री देवाची प्रतिष्ठापना केली, असं लोक म्हणून दाखवतात. त्यानंतर ते दत्त मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले असावे. नजीकच्या तीस वर्षात, येथील गावकऱ्यांनी दत्त महाराजांची त्रिमूर्ती बसवली. गेले सुमारे पन्नास वर्षे, दर वर्षी दत्त जयंती च्या आधीच्या सप्ताहात, येथे पारायण चालू असते.
याच मंदिरातील गणपतीची उपासना श्री विठ्ठल दत्तात्रय कवि यांनी केल्याची नोंद पुण्यामध्ये पेशवेंच्याकडे असल्याचे कळते. व बरेच वर्षे ज्योतिष शास्त्री म्हणून ते नानासाहेब पेशव्यांच्या दरबारी होते, असे ऐकीवात आहे. अगदी नजीकच्या काळापर्यंत मंदिराला पेशव्यांच्याकडून दरमहा रु २००/- मदत मिळत होती, असे पूर्वज सांगतात.
|
|
|